- रामदास आठवले यांचे पिंपरीत शेतकऱ्यांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२१) :- “दिल्लीतील शेतकरी आंदोलन थांबणं आवश्यक आहे. शेतकरी कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. पुढचा आदेश येईपर्यंत स्थगिती कायम राहणार आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेणे अत्यंत आवश्यक होतं. तरी देखील आंदोलन रेटण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही आंदोलन केलेली आहेत. पण आम्ही असा लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही.” अशा शब्दांमध्ये केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज (शनिवार) शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली.
यावेळी रामदास आठवले म्हणाले, “जवळजवळ दोनशे लोकांचा मृत्यू सिंघू आणि गाझीपूर बॉर्डरला झाला आहे. त्याला कोण जबाबदार आहे?…सरकारच म्हणणं हे आहे की त्या कायद्यामध्ये तुम्हाला ज्या शंका आहेत त्या दूर करण्याची तयारी आहे. APMC ला धक्का लागणार नाही अस सरकारच म्हणण आहे. MSPA ला पूर्णपणे स्वतंत्र ठेवलेले आहे असंही सरकारच म्हणण आहे.” ते पिंपरी-चिंचवड शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
तसेच, “ट्रॅक्टर रॅलीला परवानगी दिली सर्व ट्रॅक्टर दिल्लीमध्ये आले. त्यांना जो रूट दिलेला होता तो सोडून ते इतर सगळीकडे फिरू लागले त्यामुळे पोलिसांबरोबर संघर्ष झाला. पोलिसांवर हल्ले करण्यात आले. अत्यंत भयंकर म्हणजे लाल किल्ल्यावर जाऊन तिथं आपल्या तिरंगा ध्वजाचा अपमान करण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यांना रॅलीला परवानगी दिली नसती तर सरकारच्या विरोधात आणखी रोष निर्माण झाला असता.” असंही रामदास आठवलेंनी यावेळी बोलून दाखवलं.


















