- भाजपचे किशोर हातागळे यांच्या मागणीची आयुक्तांकडून दखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२१) :- निगडीतील महाराणा प्रताप उद्यानाची सुरक्षा या स्मारकाच्या स्थापनेपासुन वाऱ्यावरच होती. याठिकाणी तातडीने २४ तासासाठी सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी भाजप कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली होती.
मागणीच्या प्रस्तावाची दखल घेत अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी याला मान्यता देत तातडीने ३ सुरक्षारक्षक नेमण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हातागळे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
निगडी बसस्थानकाच्या शेजारीच असणाऱ्या या उद्यानात प्रवाशांची नेहमीच उठबस असते पण याच ठिकाणी दिवसा व रात्री काही मद्यपी वाटसरू येथे बिनधास्तपणे दारू पितात, उद्यानात दारूच्या बाटल्या इतरत्र पडलेल्या असतात, याठिकाणी स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर आहे, रात्रीही बऱ्याच उशिरापर्यंत काही प्रेमी युगुल याठिकाणी बसलेले असतात, महत्वाचं म्हणजे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या मागेच त्याच चौथाऱ्यावर काही मनोरुग्ण बसलेले असतात. जमा केलेले अन्न ते त्याठिकाणीच बसुन खाताना दिसतात. त्यामुळे या पुतळ्याचे पावित्र्य भंग होत होती.
ही गंभीर बाब हातागळे यांनी उजेडात आणुन यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर, सुरक्षा विभाग व उद्यान विभागाकडे तातडीने सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी करत पाठपुरावा केला होता.