- रहाटणीत सेवा सप्ताहाचे आयोजन..
- महिला भगिनींनाही देणार मोफत स्वयंरक्षक शिबिराचे धडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२१) :- भाजपचे लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रखुमाई महिला सेवा संस्था व वस्ताद ग्रुपच्या वतीने तसेच पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या सौजन्याने रहाटणीत सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात विद्यार्थिनी व महिला भगिनींसाठी मोफत स्वयंरक्षक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महिलांना स्वतःचा व्यवसाय करता यावा यासाठी महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबीरात सोमवारी (दि. १५) रोजी केक, शिवणकाम, रांगोळी, मेहंदी, ब्युटी पार्लर चे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. टोलनाक्यांवर नागरिकांची अडचण होऊ नये, यासाठी चार चाकी वाहनाधारकांना मंगळवारी (दि. १७) रोजी फास्टटॅग वाटपचे वाटप करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री हाॅकर्स कर्ज वाटप योजनेंतर्गत छोट्या व्यवसाय करणाऱ्यांसाठी दहा हजारपर्यंत स्वनिधी कर्ज योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. शिवाय प्रधानमंत्री हाॅकर्स कर्ज वाटप योजना, मुलांसाठी ऑनलाईन चित्रकला स्पर्धा, ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी या 8600757474 / 8766980890 मोबाईल क्रमांकावर व संदिप भानुदास नखाते यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा.
याशिवाय उद्यापासून रविवारी (दि. १४) ते सोमवारी (दि. २२) रोजी दुपारी ३.०० ते सायं. ६.०० या दरम्यान रहाटणीतील प्रत्येक सोसायटी व कॉलनीत होणार आहे. या शिबिरात सिलंबम आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजय टेपुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाठी-काठी, दंड पट्टा, रोप, विनाशस्र आत्म स्वरक्षण, ओढणी, पर्स यांचा शस्र म्हणून उपयोग आदींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना आयोजक संदीप नखाते म्हणाले की, महिला, भगिनी, शालेय विद्यार्थिनींवर होणारे अत्याचार, त्यांची छेडछाड यापासून त्यांचे सरंक्षण करण्यासाठी त्यांना स्वरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. त्याकरिता रहाटणीतील विविध सोसायट्या व कॉलनीत ‘मोफत स्वयंरक्षक शिबिर’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याशिवाय या सेवा सप्ताहात महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबीर, वाहनधारकांना फास्टटॅगचे वाटप, प्रधानमंत्री हाॅकर्स कर्ज वाटप योजना शुभारंभ, प्रधानमंत्री हाॅकर्स कर्ज वाटप योजना, मुलांसाठी ऑनलाईन चित्रकला स्पर्धा, ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेवा सप्ताहाची शोभा वाढवावी, असे आवाहन नखाते यांनी केले आहे.