सत्ताधारी भाजपचा शेवटचा अर्थसंकल्प; शहरवासियांना चमत्काराची अपेक्षा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प येत्या गुरुवारी (दि.१८) सादर होणार आहे. आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याने अर्थसंकल्पातून नवीन काय मिळणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेचा हा ३९ वा अर्थसंकल्प असणार आहे. तर, आयुक्त राजेश पाटील यांचा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता विशेष स्थायी समिती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत आयुक्त राजेश पाटील अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
दरम्यान, मागीलवर्षी मूळ ५२३२ कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह ६ हजार ६२७ कोटी ९९ लाख रुपयांचा अर्थसंकल्प होता. यंदा किती कोटींचा अर्थसंकल्प असेल. त्यामध्ये वाढ होणार की घट होणार, शहरवासीयांना नवीन काय मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


















