- तब्बल ३८१ घरगुती गॅस जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरातून घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडून तब्बल ३८१ घरगुती गॅस हस्तगत करण्यात आले आहेत.
मुख्य गोडाऊनमधून इतर दुसऱ्या गोडाऊनमध्ये गॅस सिलेंडर नेऊन तिथे कनेक्टरच्या सहाय्याने एका सिलिंडरमधून एक ते दोन किलो गॅस दुसऱ्या रिकाम्या सिलेंडरमध्ये भरायचे.”
पुन्हा, ते गॅस ग्राहकांना विकायचे. हे सर्व सांगवी परिसरातील भैरवनाथ गॅस आणि कांकरिया गॅस एजन्सी मधील कर्मचारी आहेत. त्याच्याकडून १४ टेम्पोमध्ये ३८१ गॅस च्या भरलेल्या आणि रिकाम्या टाक्या सामाजिक सुरक्षा पथकाने ताब्यात घेतल्या आहेत.