न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसें.) :- मोरवाडीतील पिंपरी चिंचवड न्यायालयास जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. बी. अगरवाल यांनी मंगळवार (दि. १८) रोजी अचानक भेट दिली. पिंपरी न्यायालयातील कामकाज आणि अडचणी यांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पिंपरी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. पिंगळे, ए यु सुपेकर, एन टी भोसले, एस. जी. आगरवाल तसेच पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर, माजी अध्यक्ष अॅड. विलास कुटे, अॅड. किरण पवार, अॅड. सुहास पडवळ, अॅड. सतीश गोरडे, अॅड. सुनील कड, अॅड. सुदाम साने, उपाध्यक्ष अॅड. योगेश थंबा, सचिव अॅड. गोरख कुंभार, सहसचिव अॅड. अंकुश एम. गोयल, खजिनदार अॅड. संतोष मोरे, ऑडीटर अॅड. महेश टेमगिरे, सदस्य अॅड. पुनम राउत, अॅड. निलेश ठोकळ, अॅड. विकास बाबर, अॅड. केशव घोगरे, अॅड. मोनिका सचवाणी, अॅड .बाळासाहेब रणपिसे, अॅड. प्रसन्ना लोखंडे, अॅड. बी. के. कांबळे आदी उपस्थित होते.
मुख्य न्यायाधीश एस बी अगरवाल म्हणाले की, शहरातील न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्याबाबत उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे न्यायाधीशांना जागा उपलब्ध करून त्यांच्या नियुक्तीची आवश्यकता आहे. तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध झालेल्या नेहरूनगर येथील महापालिकेच्या इमारतीमध्ये पिंपरी येथील न्यायालय तातडीने स्थलांतरित होणे अत्यंत आवश्यक असल्याचे, मत यावेळी अगरवाल यांनी व्यक्त केले.















