न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसें.) :- अर्थसंकेत संस्थेच्या वतीने ठाणे मनपा भवनमध्ये अर्थ साक्षर पुरस्कार २०१८ सोहळा पार पडला. या सोहळ्यात फॉर्च्यून समूहाचे संचालक नितीन धिमधिमे, मकरंद पांडे, माध्यम सेवा देणारे शब्द पब्लिसिटीचे संचालक शिवाजी घोडे यांना अर्थ साक्षर युवा उद्योजक म्हणून पुरस्कार देवून सन्मानित केले.
यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, उद्योजिका व नगरसेविका परिशा सरनाईक, अर्थसंकेतचे अध्यक्ष अमित बागवे, उपाध्यक्षा रचना बागवे आदी मान्यवर उपस्थित होते.
अर्थसंकेत संस्थेकडून समाजात उल्लेखनीय कार्य करणारे व शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो.










