- अ ‘ क्षेत्रीय कार्यालयावर फेरीवाल्यांचे आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत संत तुकाराम व्यापार संकुल परिसरामध्ये सुमारे पंचवीस वर्षापासून व्यावसायास निर्बंध व विक्रेत्यांना अटकाव करण्यासाठी म्हणून महानगरपालिके तर्फे बेकायदेशीरपणे लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात येत आहेत, याला महासंघाने तीव्र विरोध केला असून यापुढे तिव्र आंदोलनाचा इशारा देत स्मार्ट सिटीमध्ये गरिबांनी जगायचे का नाही? असा सवाल महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केला.
नॅशनल हॉकर फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे मनपाच्या अ ‘ क्षेत्रीय कार्यालयावर सामाजिक अंतर राखून आज बुधवारी तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, मनपा समिती सदस्य राजेंद्र वाकचौरे, संघटक प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, मधुकर वाघ, अंबालाल सुखवाल, वसंत जाधव प्रकाश साळवे, ओम प्रकाश , प्रकाश मेहेर ,फरीद शेख ,रामा बिराजदार ,देवीलाल आहेर, काशीम तांबोळी यांच्यासह परिसरातील विक्रेते उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत विविध ठिकाणी कामकाज होत आहे. मात्र स्मार्ट सिटीचे कार्य हे केवळ सीसीटीव्ही कॅमेरे, चकचकित रस्ते, उंच उंच इमारती म्हणजे स्मार्ट सिटी नसून या शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी काय उपाययोजना केल्या यावर ठरते. महापालिकेने याबाबत कायदेशीर नोटिस दिली असुन यापुढे लढाई तिव्र करु. महापालिकेने फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करावी बैरीगेडचे काम रद्द करा. विक्रेत्या वरील कारवाई थांबवावी अशा मागण्याचे निवेदन देउन शिष्ठमंडळाने मनपाच्या अ’ क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.