- आज ८१२ जणांना बाधा; पाच रुग्णांचा मृत्यू तर, ३७३ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज (दि. ११ मार्च) रोजी ८१२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ३७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – निगडी प्राधिकरण (८२ वर्षे), पिंपरी (५३ वर्षे), भोसरी (४९ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – हिंजवडी (७४ वर्षे) ०१ स्त्री – पुणे (७२ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १११५१५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०३८९० वर पोहोचली आहे.
आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८६६ जणांचा मृत्यू झालेला आहे. अ – ९९, ब – १३०, क – ८५, ड – १३९, इ – ९६, फ – ८७, ग – १०१, ह – ७५, एकुण – ८१२.
















