न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी (दि. १४ मार्च) रोजी ८४५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ४०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – मोशी (६८ वर्षे), विठ्ठलनगर (४७ वर्ष), संत तुकारामनगर (६४ वर्षे), १ स्त्री निगडी (६७ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – आळेफाटा (३५ वर्षे), येथील रहिवासी आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ११४०२६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०५२५६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८७६ जणांचा मृत्यू झालेला आहे.
प्रभागनिहाय रुग्णसंख्या अ – १२१, ब – १२४, क – १०५, ड – १७०, इ – ९४, फ – ९४, ग – ४९, ह – ८८ एकुण – ८४५ अशी आहे.
















