न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. १९ मार्च) रोजी १३२६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ६४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – चिंचवड (६०, ८५ वर्षे), आकुर्डी (५७ वर्षे), ०१ स्त्री – वल्लभनगर (६७ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – हिंजवडी (८० वर्षे), आळंदी (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ११९५१८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०८१४३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८९७ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या :- अ – १६७, ब – २५८, क – १५५, ड – २२९, इ – १२५, फ – १४८, ग – १२८, ह – ११६
एकुण – १३२६















