न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. मार्च २०२१) :- विकासनगर, लांडेवाडी याठिकाणी शनिवार (दि. २०) पहाटे साडेसहाच्या सुमारास केबलच्या सर्व्हररुमला आग लागली. बॅटरी चार्जिंगला लावल्याचे प्रथमदर्शनी दिसले असल्याचे त्यांनी सांगितले.
भोसरी अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली व दहा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. भोसरी अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.