- आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. मार्च २०२१) :- फिर्यादी महिलेची २१ वर्षीय मुलगी तिच्या लग्नानंतर पतीसोबत राहत होती. तिला दोन्ही मुली झाल्याच्या कारणावरून तसेच, तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा पती तिला शिवीगाळ व मारहाण करीत असे. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता.
विवाहितेने १८ मार्च २०२१ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची फिर्याद तिच्या आईने दिली. योगेंद्र मिनबहाद्दुर साही (वय २४, रा. नारायणनगर, हिंजवडी, मूळ रा. नेपाल), असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे.
याप्रकरणी मयत विवाहितेच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. १९) फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पती साही याला अटक केली.