- आयुक्तांकडून घटनेचा खुलासा करण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. मार्च २०२१) :- महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी टेक महिंद्रा लिमिटेड कंपनीला बजावली आहे.या घटनेचे मूळ कारण काय ते स्पष्ट करावे. कंपनीचे काय निरीक्षण आहे ते मुद्देसूद द्या. आगामी काळात याचे काय परिणाम होणार त्याचा तपशिल द्यावा. पुन्हा सर्व परिस्थिती पर्वपदावर कशी येणार ते कळवावे.
स्मार्ट सिटी प्रकल्प अंमलबजावणी किती विलंब होणार त्याचा खुलासा करावा. आगामी काळात पुन्हा असा सायबर हल्ला झाला तर कोणती खबरदारी घेतली आहे आणि यापुढे काय करणार आहात याचा अहवाल तीन दिवसांत द्यावा. या घटनेत नेमके आर्थिक नुकसान कोणते, किती व कसे याचा तपशिल मिळावा.
टेक महिंद्रा कंपनी आणि त्यांच्या भागीदार कंपन्या (क्रिस्टल इंटिग्रेटीड सर्व्हिस प्रा. लि. आणि आर्सेस इन्फोटेक प्रा.लि.) यांनी पाच वर्षाच्या काळात स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी आणि ऑपरेशनची जबाबदारी घेतली आहे. करारातील अटीशर्थी त्यांच्यावर बंधनकारक आहेत. प्रत्यक्षात सायबर हल्ल्यात या अटीशर्थींचा भंग झाल्याचे सिध्द झाले आहे, असेही आयुक्त पाटील यांनी नोटिशीत म्हटले आहे.
















