- जमावावर सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील कर्मचारी हे वरिष्ठां सोबत दत्तमंदिर रोड, वाकड येथे शरद वाघमारे यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेले होते.
त्यावेळी आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येत शिवीगाळ केली. एका महिलेने कारवाई करणाऱ्या पथकाच्या दिशेने दगड भिरकावला. ही घटना सोमवारी (दि. २२) सकाळी दत्तमंदिर रोड, वाकड येथे घडली.
याबाबत ऋषिकेश सुदेशकुमार कांबळे (वय २९) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर शरद वाघमारे, त्याच्या दोन बहिणी आणि अन्य दोन महिला यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















