- लसीकरणासाठी संपर्क साधण्याचे राज तापकीर यांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २७ पिंपरी चिंचवड मनपा शाळा क्र. ५५ रहाटणी येथे मोफत कोविड-१९ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
प्रभागातील सर्व जेष्ठ नागरिकांना या कोविड लसीकरण केंद्राचा लाभ घेता येणार आहे. या लसीकरण केंद्राची पाहणी नगरसेविका सुनीता हेमंत तापकीर यांनी नुकतीच केली. लसीकरणाबाबत डॉक्टर, नर्स व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.
लसीकरणासाठी नाव नोंदणीकरिता पॅन कार्ड/आधार कार्ड घेऊन यावे. लसीकरणासाठी येताना जेवण करून यावे. पहिली कोविड लस घेतल्यानंतर दुसरी कोवीड लस ६ आठवड्यानंतर घेण्यात यावी. ऑनलाइन लिंक व नाव नोंदणीसाठी www.cowin.gov.in, ९१७५२७२७२७, ९६८९९५०५७७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज तापकीर यांनी केले आहे.
















