- उपनगर मोठे असल्याने भूमकर वस्तीत लसीकरण केंद्र उभारा- विशाल वाकडकर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- वाकड उपनगराची लोकसंख्या मोठी आहे. त्यातच पालिकेचे वाकड गावठाणातील कोरोना लसीकरण केंद्र एका टोकाला असल्यामुळे जेष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे.
संपूर्ण वाकडचा भार एका केंद्रावर पडल्याने केंद्रावर मोठी गर्दी उसळत आहे. बऱ्याच जणांना लस न घेताच मागे परतावे लागत आहे. पालिकेकने भूमकर वस्तीतील ‘आबाजी भूमकर शाळा’ परिसरात आणखी एक कोरोना लसीकरण केंद्र सुरु करावे.
जेणेकरून नागरिकांची गैरसोय टळेलं, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पवार, मयुर जाधव, सरचिटणीस प्रतिक साळुंखे आदी उपस्थित होते.