- बेशिस्त आणि बेजबाबदार वर्तनामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढतोय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलिसांनी मंगळवारी (दि. २३) मास्क न वापरल्या प्रकरणी २८६ जणांवर कारवाई केली आहे. शहरात करोनाचा उद्रेक होत असताना नागरिक मात्र नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. अशा बेशिस्त आणि बेजबाबदार वर्तनामुळे करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे.
मंगळवारी पिंपरी चिंचवड शहरात १ हजार ५१९ नवीन रुग्ण आढळून आले. तर १३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. तसेच नियमभंग करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई देखील केली जात आहे.
मंगळवारी पोलिसांनी केलेली विनामास्कची कारवाई एमआयडीसी भोसरी (३३), भोसरी (२५), पिंपरी (००), चिंचवड (१६), निगडी (११), आळंदी ३३), चाकण (१६), दिघी (१९), सांगवी (२२), वाकड (००), हिंजवडी (०८), देहूरोड (११), तळेगाव एमआयडीसी (०२), चिखली (३०), रावेत चौकी (१७), शिरगाव चौकी (२२), म्हाळुगे चौकी (२१).
















