- सुरक्षित अंतर धोरणाचा फज्जा उडाल्याने पालिकेकडून फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर हिराबाई घुले यांच्या मुलासह ६० ते ७० जणांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चेतन गोवर्धन घुले (रा. गणेशनगर, बोपखेल असे गुन्हा दाखल झालेल्या उपमहापौराच्या मुलाचे नाव आहे. ते महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती होते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गर्दी जमवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील सुरक्षा परिवेक्षक दतात्रय भोर (वय ६०, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. .
करोनाचे सर्व नियम पाळून निवडणूक प्रक्रिया होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात निवडणुकीसाठी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने जमले होते. निवडणुकीच्या कालावधीत मुख्यालयात सुरक्षित अंतर धोरणाचा पूर्णपणे फज्जा उडाला. कित्येकांनी मुखपट्टी परिधान केलेली नव्हती, असे दिसून आले होते.
















