न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. २५ मार्च) रोजी १८११ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ७२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०५ पुरुष – संत तुकाराम नगर (७२ वर्षे), फुगेवाडी (२१ वर्ष), पिपरी (७८ वर्षे), चिंचवड (७८ वर्षे), सांगवी (६४ वर्षे), ०२ स्त्री – पिंपरी (६५ वर्षे), दिघी (६५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ४ पुरुष – जुन्नर (६५ वर्ष), पाबळ (७६ वर्षे), खडकी (५३ वर्षे), पुणे (७२ वर्षे), ०२ स्त्री – चाकण (५७ वर्षे), पुणे (५६ वर्षे) येथील रहिवासी आहेत. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ०६ मत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १२८७४७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ११२७६२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १९५० जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २३१, ब – ३४६, क – १४६, ड – २९८, इ – १७४, फ – २०१, ग – २७४, ह – १४१, एकुण – १८११.
















