न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २२ डिसें.) :- ड्रीम इव्हेन्टच्या माध्यमातून ‘तोंडाला पाणी, महाराष्ट्रीयन फूड फेस्टव्हल’ या खाद्य महोत्सवाची अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची मेजवानी चाखण्याची संधी खवय्यांना मिळत आहे.
औंध परिसरातील पोलीस ग्राउंडच्या मैदानावर दि. २१ डिसेंबर रोजी या महोत्सवाचे उद्घाटन झाले असून, केवळ उद्याचा दिवस (२३ डिसें) दुपारी ४ ते रात्री १०. ३० वाजेपर्यंत खवय्यांना विविध पदार्थांवर ताव मारण्याची संधी मिळणार आहे.
हौसेनं खाद्यपदार्थांवर केले जाणारे नवनवीन प्रयोग आणि तरीही दुसऱ्या बाजूला आपल्या पारंपरिक चवीशी बांधलेली घट्ट नाळ हे महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्यच… असे सगळे अस्सल खाद्य पदार्थ, पुणेकरांना या खाद्य महोत्सवात अनुभवता येणार आहेत. तुम्हाला हवा तो पदार्थ तुमच्या जिभेची लज्जत पुरवायला या फेस्टिव्हलमध्ये हजर असणार आहे.
पुणेरी, खान्देशी, कोकणी, मालवणी आणि महाराष्ट्रीयन स्वाद यावेळी खवय्यांना चाखता येणार आहे. तांबड्या पांढऱ्या रश्श्यापासून ते मिसळपर्यंत व विविध पदार्थांवर यथेच्छ ताव मारण्याची पुणेकर शौकीन खवय्यांना या फेस्टिवलमध्ये संधी मिळणार आहे. या खाद्य महोत्सवास पुणेकरांचाही भरभरुन प्रतिसाद मिळत आहे, तेव्हा चला या विकेंडला स्वादिष्ट बनवूया असे आव्हान आयोजकांनी केले आहे.










