न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसें.) :- शहरातील शालेय विद्यार्थ्यांना वेळेत सकस पोषण आहार देण्याबाबत महापौर कार्यालयात पोषण आहार पुरविणा-या बचतगटांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर जाधव यांनी बचतगटांना सूचना दिल्या.
यावेळी प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी पराग मुंडे, विभागीय पर्यवेक्षक, शालेय पोषण आहाराचे काम पहाणारे संबंधित कर्मचारी व ३८ बचत गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महापौर जाधव म्हणाले, आपण सर्व शाळांची पाहणी केलेली आहे. शहरातील विद्यार्थ्यांना सकस, पूरक पोषण आहार मिळणे आवश्यक आहे. पोषण आहार तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छता राखावी. आहार साहित्य चांगल्या दर्जाचे वापरावे. आता जसा पोषण आहार दिला जातो. तसाच यापूढेही देण्यात यावा. मी अचानक शाळांना भेट देणार आहे. त्यामध्ये पोषण आहाराची गुणवत्ता दिसून न आल्यास कारवाई करण्यात येईल.










