न्युज पीसीएमसी नेटवर्क : पिंपरी : व्यवसाय करायचाय? तर व्यवसायिक सल्ला व मार्गदर्शन पाहिजे. त्याकरिता सल्लागार शोधत फिरण्याची आता आवश्यकता नाही. कारण पिंपरी-चिंचवड शहरातील नॉव्हेल या संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते मा. अमित गोरखे तसेच नगरसेविका व अ प्रभाग अध्यक्षा अनुराधाताई गोरखे यांच्या सहयोगाने मोफत उद्योजकता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १ सप्टेंबर शनिवार रोजी संभाजीनगर येथील रोटरी क्लब येथे सायं. ६. वाजता पालकमंत्री गिरीश बापट, आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, महेशदादा लांडगे, खासदार अमर साबळे तथा इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे उदघाटन होणार असून शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
निगडी येथील संत तुकाराम व्यापार संकुलामधील नोव्हेल या संस्थेत शिबिराचे प्रशिक्षण शिबीर होणार असून या उद्योजकता प्रशिक्षण शिबिरामध्ये व्यवसायिक मार्गदर्शन ज्यात नवीन व्यवसाय, डिजिटलविषयक नवीन संकल्पना, आर्थिक नियोजन, कर्ज उपलब्धता, विविध शासकीय योजनांची माहिती, महिलांकरीता विशेष उद्योगपर मार्गदर्शन, तज्ज्ञांकडून क्षमता प्रशिक्षण मार्गदर्शन अशा विविध व्यवसायास पूरक अशा गोष्टींचा उलगडा या शिबिरात करून देण्यात येणार आहे. एकूण १०० दिवसांचे पूर्णपणे मोफत असे हे मार्गदर्शन शिबीर असून आतापर्यंत १२०० पेक्षा अधिक तरुण-तरुणी, महिला-पुरुषांनी या शिबिरात सहभाग नोंदवला आहे. सहभागी होण्याकरिता 9119445533 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करण्याचे आवाहनही संयोजकांनी केले आहे.












