न्युज पीसीएमसी नेटवर्क : ताथवडे प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य कुटुंबकल्याण विभाग व वाल्हेकरवाडी रुग्णालयांतर्गत ताथवडे येथील गाडारोड परिसरातील गंगा-अंबर या ईमारतीच्या आवारात सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन गटनेते पिं. चि. मनपा, नगरसेवक राहुलदादा कलाटे, नगरसेविका, आश्विनीताई वाघमारे, पिं. चिं. मनपा वैद्यकिय अधिकारी, डाॅ. अनिल राॅय, यांचे हस्ते झाले.
शिबिरात उपस्थित नातेवाईक व रूग्णास डेंग्यु, स्वाईन फ्ल्यू, इतर साथीचे आजार, गरोदर माता, बालक-लसीकरण, असंसर्गजन्य रोग, बालरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, रक्तदाब, मधुमेह व इतर सर्व रोगांची मोफत तपासणी व जनजागृती करण्यात आली. तसेच महापालिकेच्या वैद्यकिय विभागामार्फत राबविण्यात येणाय्रा विविध योजना आणि उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली. बांधकाम मजुर व परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
राहुल कलाटे यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा आजारांना मोफत निमंञण मिळेल, त्याकरिता व्यायाम व तणावरहीत जीवन जगण्याचे महत्व विषद केले. तसेच महापालिकेच्या NUHM अंतर्गत आरोग्य विभागाच्या आऊटरिच कॅम्पच्या कामाचे कौतुकही केले.
शिबिरास तालेरा रूग्णालयाचे डाॅ. सुनिल जाॅन, स्ञिरोग तज्ञ डाॅ. क्षिरसागर मॅडम, डाॅ. वंदना, डाॅ. तायडे, प्रभारी वैद्यकिय अधिकारी वाल्हेकरवाडी डाॅ. गितांजली कोल्हे, आरोग्यसेवक अजय गजमल, एम.पी.डब्ल्युचे भालचंद्र राऊत, सर्व ए. एन. एम. स्टाफ, आशा स्वयंसेविका सौ. लोखंडे व आदी उपस्थित होते.












