- महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२१) :- स्वच्छता मुकादम विनयभंग करतो, तसेच त्याच्या इच्छेप्रमाणे न वागल्याने कामावरून काढले, असा आरोप करीत महापालिकेच्या बदली कामगार महिलेने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
शनिवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यासमोरच ही घटना घडली. रूक्मिणी पाटील (विठ्ठलनगर) असे त्या महिलेचे नाव आहे. स्वच्छता मुकादम शशिकांत कांबळे तसेच स्वच्छता निरीक्षक अंजली कुदळे या कामावरून वारंवार त्रास देतात, असा आरोप पाटील यांनी आयुक्त तसेच पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनात केला आहे.
















