न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३) :- विश्व शांती सेवा समिती पुणे विभागाच्या वतीने (दि. २४ ते ३१ डिसें.) या दरम्यान आयोजित केलेल्या श्रीमद भागवत कथा सप्ताहात प. पू. पंडित देवकीनंदन ठाकूर महाराज निरूपण देणार आहे.
निगडी येथील भेळ चौकाजवळ असलेल्या नियोजित महापौर निवास मैदानावर हा सोहळा रोज दु २:३० ते ६:३० या वेळेत होईल. दि २४ रोजी उदघाटन होईल. यावेळी व्यास नारद संवाद, २५ रोजी कपिल देवाहुती संवाद, २६ रोजी नृसिंह व वामन अवतार, २७ रोजी जडभरत संवाद, २८ रोजी श्रीराम व कृष्णा जन्माष्टमी सोहळा, २८ बाललीला गोवर्धन पूजा, २९ रोजी रुख्मिणी विवाह, ३० सुदामा चरित्र या विषयावर निरूपण देणाऱ आहे. तर ३१ रोजी भजनामृत व भंडारा होईल अशी माहिती अध्यक्ष जगदीशप्रसाद सिंघल यांनी दिली.










