न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२१) :- मोक्कातील तसेच तडीपार आरोपीला बड्या ठोकण्यात आल्या. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन आरोपींना अटक केली. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. शांताराम ऊर्फ टोग्या ऊर्फ पप्पू (वय ३०, रा. ओटास्किम, निगडी) आणि नितीन सुधाकर भोसले (वय २१, रा. काळेवाडी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली कारवाई गुरुवारी (दि. ८) करण्यात आली. त्यात आरोपी कांबळे याला अटक केली. आरोपी कांबळे याला परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्तांनी २२ जानेवारी २०२१ राजी जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केले होते. दरम्यान तडीपार आरोपींची चौकशी करीत असताना आरोपी कांबळे हा शहरात आला असून, त्याने तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. आरोपी कांबळे याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात यापूर्वी तीन वेगेवगेळे गुन्हे दाखल आहेत.
दुसरी कारवाई शुक्रवारी (दि. ९) करण्यात आली. मोक्कातील पाहिजे असलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत होते. त्या वेळी आरोपी नितीन भोसले हा मोई (ता. खेड) येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पाठलाग करून आरोपी भोसले याला पकडले. त्याला वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव तपास करीत आहेत.