- इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून कोसळला; ठेकेदारावर गुन्हा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२१) :- इमारतीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना ७ एप्रिल रोजी दिघी येथील तनिष पर्ल सोसायटीत घडली. याप्रकरणी १५ एप्रिल रोजी कंत्राटदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
द्विजेन कुमार बिसवास (३२, रा. दलाईग्राम, जि. नदिया, पश्चिम बंगाल) असे मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी जावेद याकुब खडखडे ३१, रा. विश्रांतवाडी पुणे, मूळ रा. उस्मानाबाद) या कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस हवालदार मिनिनाथ गंगाधर टेमकर यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्विजेन बांधकाम साईटवर काम करत असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.