- घरगुती साहित्याची मोडतोड; पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- मुलगी पळवून लावल्याच्या संशयावरून तीन जणांनी आपल्याच नातेवाईकाच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. ही घटना बुधवारी (दि. १४) दुपारी पिंपरी येथे घडली. विकी सतीश ठोकळ (वय ३०), शंकर काशिनाथ काळे (वय ३४) आणि अशोक जनार्दन साठे (वय ३५) तिघेही रा. सॅनिटरी चाळ, पिंपरी अशी आरोपींची नावे आहेत.
अविनाश काशिनाथ काळे (वय २७, रा. सॅनिटरी चाळ पिंपरी) यांनी रविवारी (दि. १८) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींची एक नातेवाइक मुलगी फिर्यादी अविनाश यांच्या मेहुण्यासोबत पळून गेली. तिला पळून जाण्यात फिर्यादी यांची फूस असल्याच्या संशयावरुन आरोपी १४ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास फिर्यादी अविनाश यांच्या घरी आले.
तूच आमच्या नातेवाईक मुलीला फूस लावून पळवून लावले आहे, असे आरोप करीत शिवीगाळ केली. तसेच घरातील दोन टिव्ही फोडून नुकसान केले. यावेळी फिर्यादी यांना मार लागल्याने ते घाबरून गेले होते. त्यानंतर रविवारी (दि. १८) याच कारणावरून फिर्यादी यांच्या आई संगीता काळे यांना शिवीगाळ केली.