न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मे. २०२१) :- भोसरी एमआयडीसीतील हिंदुस्तान प्रेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील कंपाउंडवर चढून आरोपीने कंपनीत प्रवेश केला. कंपनीतून ४९ हजार रुपये किमतीचे सात प्रेसिंग मटेरियल डायचे कॉइल आरोपीने चोरून नेले.
हा प्रकार रविवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास घडला. बाळासाहेब सिताराम अंबुरे (वय ४६, रा. चिंचवड) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमीर हुसेन शेख (वय २७ रा. रिंगरोड, पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.