- सरकारी कामात अडथळा; आरोपीला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपी प्रतिक पवार याला मार्च २०२० मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो पोलिसांची परवानगी न घेता शहरात आला. तो बुधवारी (दि. १२) दुपारी सव्वा पाच वाजताच्या सुमारास बापूजीबुवानगर, थेरगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ दहशत माजवीत होता.
याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले असता त्याने पोलिसांशी हुज्जत घालून पोलिसांचा शर्ट धरून धक्काबुक्की केली. प्रतीक अंतवान पवार (वय २०, रा. गुरूनानकनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलीस नाईक एन बी गेंगजे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.