न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. मे. २०२१) :- तरुणाला जीवे मारण्याची धमकी देत चौघांनी मिळून त्याच्याकडील किमती ऐवज काढून घेतला. ही घटना पिंपरी येथे बुधवारी (दि. १२) रात्री घडली.
जतीन टाक (२६, रा. रिव्हर रोड, पिंपरी), सलीम शेख (२५. रा. मिलिदनगर, पिंपरी) आणि त्यांचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपिंची नावे आहेत. याप्रकरणी संजय राम तिलोकानी (२६, रा. पिंपरी मेन बाजार, पिपरी) यांनी पिपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बुधवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी संजय हे पिपळे सौदागर येथे जाण्यासाठी निघाले होते. ते पिंपरी आले असता आरोपीनी त्यांना रस्त्यात अडविले. त्यानंतर आरोपींनी कोयत्याची मूठ व हातानी मारहाण केली. फिर्यादी यांच्याजवळ पाच हजार ५८० रुपयांचा माल आणि मोबाइल जबरस्तीने हिसकावून घेतला. पोलिसांत तक्रार दिल्यास तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.