न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. मे. २०२१) :- मुस्लिम बांधव रमजान सणानिमित्त एक महिन्याचे उपवास पकडून सण साजरा केला. प्रत्येकाच्या घरातील कुटूंबातील सर्वच सदस्य उत्साहात नवीन कपडे परिधान करून मशीद, मदरसामध्ये सामुदायिक नमाज पठण करतात. परंतु, यंदाच्यावर्षी देखील कोरोना महामारीच्या प्रसंगी भक्ती व धर्माचे स्तोम न माजवता आज घरोघरी नमाज पठण करून रमजान ईद कुटूंबासमवेतच साजरी केली.
रमजान महिन्यात मुस्लिम बांधव नमाज, तरावीह, शुक्रवारची नमाज पठणासाठी मशीद व मदरसामध्ये एकत्र येतात. राज्यात सुरु असलेल्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार समाजबांधवांना धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करण्याचे आवाहन केले होते. त्याला मुस्लिम बांधव, मशिदीचे मौलाना समितीचे पाठींबा दिला. आज रमजान ईदची नमाज पठण देखील घरोघरीच अदा करून कोरोनाचा संसर्ग टळावा, प्रादुर्भाव दूर व्हावा यासाठी अल्लाहजवळ प्रार्थना केली. या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधवांनी उपवास ठेवला. संध्याकाळी उपवास देखील सर्ववयोगटातील मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरीच उपवास सोडला व रमजानचा महिना आजची ईद अत्यंत साधेपणाने साजरी केली व राज्य शासनाच्या नियम अटींची पूर्तता करीतच ईद साजरी केली.
शिरखुर्मा घरोघरी करून घरातील कुटूंबानी त्याचा आस्वाद घेतला, तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांनी गोरगरीबांना किटचे वाटप केले. काहींनी आपल्या शेजारींना देखील शिरखुर्मा बंदिस्त डब्यात देत सामाजिक बांधिलकीची जपणूक केली. घरोघरी पुरुष, कुटूंबातील महिलांनी देखील एकत्रित नमाज पठण केले. महिनाभर अनेक कुटूंबीयांनी कुराणचे पठण केले. यापूर्वी मुस्लिम बांधव इतर बांधवांच्या घरोघरी जावून ईदच्या शुभेच्छा, अलिंगण देत करीत होत्या. यंदा तसे कुठेही आढळून आले नाही. घरोघरीच कुटूंबीयांनी एकमेकांना शुभेच देत सण साजरा केला. मोबाईलद्वारेच नातेवाईक व मित्रांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या.