- शासनाकडून लसीचा पुरवठा नाही; पालिकेचे स्पष्टीकरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका लसीकरण केंद्रावर आज रविवारी १५७९ लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे. महानगरपालिकेस शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्यामुळे उद्या दि.१७/०५/२०२१ रोजी कोणत्याही वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही.
या अनुषंगाने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, लसीकरण केंद्र बंद असलेने लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये नागरीकांनी गर्दी करु नये व सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.