- काळेवाडी घटनेतील आणखी एका डॉक्टरला बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२१) :- रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार प्रकरणात सहभाग आढळूल्याने पोलिसांनी आणखी एका डॉक्टरला अटक केली आहे. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली. डॉ. सचिन रघुनाथ पांचाळ असे अटक केलेल्याचे नाव आहे.
यापूर्वी शशिकांत रघुनाथ पांचाळ (३४, रा. दत्त कॉलनी, थेरगाव), कृष्णा रामराव पाटील (२२, रा. थेरगाव), निखिल केशव नेहरकर (१९, रा. चिंचवड) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाकड पोलिसांनी रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक करून त्यांच्याकडून २१ इंजेक्शन जप्त केली होती. या गुन्ह्याच्या तपासात आरोपी डॉ. सचिन रघुनाथ पांचाळ याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास वाकड पोलिस करीत आहेत.
















