न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसें.) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी गुरुवार (दि. २७) रोजी सर्व पोलीस अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीनुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही ठिकाणी विरुद्ध दिशेने येणा-या वाहनावर कोणत्याही पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचा-याला कारवाई करता येणार आहे.
जे पोलीस कर्मचारी विरुद्ध दिशेने येणा-या वाहनांवर कारवाई करतील, त्या पोलीस कर्मचा-यांना पोलीस आयुक्त बक्षीस (रिवार्ड) देणार आहेत. या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांवर भारतीय दंड संहिता कलम २७९ अन्वये कारवाई होणार आहे. पोलीस कर्मचा-याने संबंधित चालकावर कायदेशीर कारवाई करून त्याचा वाहन चालविण्याचा परवाना आयुक्तांकडे घेऊन गेल्यानंतर आयुक्त संबंधित कर्मचा-याला बक्षीस (रिवार्ड) देणार आहेत.












