- रुबी एलकेअरला कामाचा ठेका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने वायसीएम रुग्णालयात दाखल रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना मार्गदर्शन करण्यासाठी दहा समुपदेशकांची नेमणूक केली आहे. त्याचबरोबर माहिती देण्यासाठी दहा स्वागतिका यांची नेमणूक केली आहे.
वायसीएम रुग्णालयात शहराबरोबरच जिल्ह्यातील रुग्ण येत असतात. माहितीअभावी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना अडचणी येतात. मेसर्स रुबी एलकेअर सर्व्हिसेस प्रा. लि. या संस्थेमार्फत कर्मचाऱ्यांची २३३०० मानधनावर दोन महिन्यांच्या कालावधीसाठी नेमणूक केली आहे.
तीन शिफ्टमध्ये या कर्मचाऱ्यांचे काम असणार आहे. पहिल्या शिफ्टमध्ये चार समुपदेशक आणि चार स्वागतिका, दुसऱ्या शिफ्टमध्येही चार समुपदेशक आणि चार स्वागतिका असतील.


















