न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसें.) :- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ६९ व्या जयंती दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात ‘आठवणीतील मुंडे साहेब’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमप्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे-५ येथील मॉडर्न हायस्कूल, यमुनानगर-निगडीचे गुणवंत शिक्षक खंडू खेडकर यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल ग्रामविकास व महिला-बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे व पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी गिरीष बापट (पालक मंत्री पुणे जिल्हा), सदाशिव खाडे (अध्यक्ष, पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण), आमदार लक्ष्मण जगताप, सचिन पटवर्धन (अध्यक्ष लोकलेखा समिती महाराष्ट्र राज्य, राज्यमंत्री दर्जा), किरण गीते (अध्यक्ष, पुणे नवनगर विकास प्राधिकरण), आर. के. पद्मनाभन (पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड), आमदार माधुरी मिसाळ, महापौर राहूल जाधव, एकनाथ पवार (सत्तारूढ पक्षनेते ), उमा खापरे (सचिव, महाराष्ट्र प्रदेश भाजपा), प्रविण घुगे (अध्यक्ष बालहक्क आयोग), बाळासाहेब पाटील (सभापती म्हाडा कोकण), केशव घोळवे (नगरसेवक पिं. चिं. मनपा), योगीता नागरगोजे (नगरसेविका पिं. चिं. मनपा) आदी मान्यवर सत्कार समयी उपस्थित होते.


















