- मनसे शहराध्यक्ष तथा गटनेते सचिन चिखलेंची आयुक्तांकडे मागणी…
- काम पूर्ण झाले असतानाही प्रशासनाकडून विलंब..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. मे. २०२१) :- निगडी भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचा रोटरी व ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते सचिन चिखल यांनी केली आहे.
यासंदर्भात चिखले यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, निगडी येथील भक्ती शक्ती चौक या ठिकाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने २०१७ साली भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचे काम चालू करण्यात आले. हे काम बी. जी. शिर्के सद्यस्थितीला करत आहेत. उत्कृष्ट दर्जाचे काम चालू आहे. २०१७ ते २०२१ या कालावधीमध्ये भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात आले. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नागरिकांना या कामामुळे वाहतुकीसाठी नाहक त्रास सहन करावा लागला आहे. वाहतुकीसाठी नागरिकांना मोठा वळसा घालून जावे लागत आहे.
काम पूर्ण झाले असता भक्ती शक्ती उड्डाणपूल रोटरी व ग्रेड सेपरेटर लोकांसाठी खुला करण्यात यावा. नागरिकांना वळसा घेऊन खूप दूरवरून जावे लागत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ग्रेड सेपरेटर खुला करण्याची नितांत गरज आहे. काम पूर्ण झाले असताना प्रशासनाने हा ग्रेड सेपरेटर का बंद ठेवला हेच कळत नाही, असा सवाल देखील चिखले यानी केल आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भक्ती-शक्ती उड्डाणपूलवरील रोटरी व ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी चिखले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
















