- नद्यांच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचा आराखडा तयार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. मे. २०२१) :- शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा या नद्या वाहतात. नद्यांचा डीपीआर पिंपरी – चिंचवड महापालिकेने तयार केला आहे. याविषयीचे सादरीकरण पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत झाले. त्यात पर्यावरण विभागाच्या परवानगी आणि विविध विषयांवर चर्चा होऊन नदीसुधारच्या डीपीआरला राज्य शासनाने हिरवा कंदील दिला आहे.
पिंपरी – चिंचवड शहरातील पवना व इंद्रायणी, मुळा नद्यांच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचा आराखडा तयार झाला आहे. शहरातील पवना व इंद्रायणी नदीपात्रांचा पूर्ण सर्व्ह करून नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त राजेश पाटील, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, बीआरएसटी विभागाचे कार्यकारी अभियंता ओबासे, उपअभियंता बापू गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीबाबत माहिती देताना विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, “ नदीसुधार प्रकल्पाची सद्यस्थिती याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. पर्यावरण परवानग्याविषयी चर्चा केली. पवना व इंद्रायणी नद्यांच्या पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्याबाबत हिरवा कंदील दाखविला. यानंतर राज्याच्या पर्यावरण कमिटीची मान्यता मिळल्यानंतर प्रकल्प मार्गी लागणार आहे. नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी, घनकचरा, प्लॉस्टिक कचर तसेच नदीच्या दोन्ही बाजूने मोठ्य प्रमाणात अनधिकृत रोडारोडा अनधिकृत बांधकाम, शेड इत्यादी होत असल्यामुळे नद्यांचे प्रदूषण मोठ्य प्रमाणात होत आहे. नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी तसेच नदीचे पुरुज्जीवन करून दोन्ही नदीकाठ विकसित करणेसाठी आवश्यक त्य सर्व उपाययोजनांचा अंतर्भाव करावा अशा सूचना केल्या आहेत.
















