- दशतवाद व हिंसाचारविरोधी दिन साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. मे. २०२१) :- देशभरामध्ये २१ मे हा दशतवाद आणि हिंसाचारविरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर पिंपरी – चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी (दि. २१) दशहतवादाशी मुकाबला करण्याची प्रतिज्ञा केली.
प्रेमलोक पार्क, चिंचवड येथील पोलिस आयुक्त कार्यालयात सकाळी अकराच्या सुमारास हा कर्यक्रम घेण्यात आला. यावेळी अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
केंद्रीय गृह मंत्रालयाने २१ मे हा दिवस दहशतवाद विरोधी दिन आणि हिंसाचारविरोधी दिन म्हणून जाहीर केला आहे. त्यानुसार पोलिसांसह जिल्हा प्रशासनाने २१ मे हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळावा, असा आदेश देण्यात आला आहे. दहशतवादाविरोधात जनजागृती होणे, हा या मागचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार पोलिस आयुक्त कार्यालयात सकाळी प्रतिज्ञा घेण्यात आली.
















