- अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. मे. २०२१) :- भटक्या कुत्र्यावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने वार केले असल्याची माहिती फिर्यादीला मिळाली. त्यानुसार, त्यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ कुत्र्याला रुग्णालयात दाखल केले. कुत्र्यावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला.
तसेच त्याच्या डोक्याला जोरदार मार लागून त्याचे डोळे निकामी झाले. यात त्याला कायमस्वरूपी अंधत्व आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांगवीतील पवार नगर येथे गुरुवारी ही घटना घडली. प्राणीमित्र अक्षय साहेबराव म्हसे (वय २५, रा. पवारनगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.