- आयुक्तांकडून रुग्णालयाला नोटीस; योग्य खुलासा द्या अन्यथा कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे. २०२१) :- नेहरूनगर येथील जम्बो रुग्णालयातील चोरीच्या प्रकरणांची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनास नोटीस दिली आहे. त्याचबरोबर कोविड केअर सेंटर (सीसीसी) बाह्यस्त्रोतामार्फत मनुष्यबळ उपलब्ध आहे.
पुरवठादारांकडून करारनाम्यातील अटी आणि शतींची पूर्तता झाली आहे किंवा कसे? मनुष्यबळ उपलब्ध आहे का, अटी- शर्तीप्रमाणे शैक्षणिक अर्हता धारण केली आहे का? याची महापालिकेची चार सदस्यीय समिती तपासणी करणार आहे.
नेहरूनगर येथील जम्बो रुग्णालय खासगी संस्थेस चालविण्यास दिले आहे. येथील रुग्णांचे साहित्य चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आयुक्त राजेश पाटील यांनी रुग्णालयास नोटीस दिली आहे. जम्बो रुग्णालयात साहित्याची चोरी होते, अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. पोलिसांत गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रशासनास नोटीस दिली आहे. याबाबत खुलासा आल्यानंतर कारवाई करू, असे पाटील म्हणाले.
महापालिकेच्या वतीने खासगी संस्थाच्यावतीने चालविण्यात येणा-या सीसीसी सेंटरमधील मनुष्यबळ यंत्रणा तपासण्यात येणार आहे. त्यात महापालिकेचे उपायुक्त मंगेश चितळे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी, आकुडी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे आणि संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अशी चार जणांची समिती तयार केली आहे.


















