- यापुढे शनिवार रविवारी दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु राहणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा शनिवार आणि रविवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु राहणार आहेत. ‘विकेंड लॉकडाऊन शिथिल करण्याचे निर्देश शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत देण्यात आले.
त्यानुसार किराणा, भाजी, दूध, बेकरी, चिकन, मटण ही आस्थापनं यापुढे शनिवारी व रविवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु राहतील. पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. उर्वरित लॉकडाऊनचे सर्व नियम लागू आहेत. त्यात कोणताही बदल नसल्याचे आदेशात म्हटले आहे.


















