न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन अधीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. त्यात रोहिणी शिंदे, लक्ष्मण पवार, राजीव घुले, रामकृष्ण आघाव, प्रभाकर शेलूकर, राजाराम सरगर, परशुराम वाघमोडे, राजेश तांबडे, विजयकुमार बाठे, सुजाता गोले यांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायलयात दाखल विशेष याचिकेच्या अंतिम निर्णयास अधिन व मागासवर्ग कर्मचाऱ्यांचे पदोत्रतीसंदर्भातील शासनाच्या मार्गदर्शनाला अधीन राहून ही पदोन्नती देण्यात आली आहे, असे प्रशासन विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी सांगितले.


















