- परीक्षा रद्द कऱण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२१) :- राज्यातल्या बारावीच्या परीक्षा आता रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. परीक्षा रद्द कऱण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
आज गुरुवारी झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
प्रस्तावाला आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. परीक्षा रद्द करण्याची भूमिका आमची पहिल्यापासूनच होती असंही वडेट्टीवार म्हणाले.

















