- स्थायी सभा तहकूबीद्वारे सत्ताधा-यांकडून आयुक्तांचा निषेध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२१) :- महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या निषेधार्थ स्थायी समितीची बुधवारची (दि.२) सभा तहकूब करण्यात आली. पुढील सभेपर्यंत आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना ३ हजारांची मदत देण्याबाबत कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना आयुक्तांना करण्यात आल्याचे अध्यक्ष अँड. नितीन लांडगे यांनी सांगितले.
शहरातील कष्टकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा सत्ताधारी भाजपने केली होती. परंतु, ही मदत नियमांना धरून नसल्याने आयुक्तांनी नकार दिला आहे. यामुळे सत्ताधारी भाजप अडचणीत सापडला आहे.
नितीन लांडगे म्हणाले की, आयुक्तांवर राजकीय दबाव असल्यानेच त्यांनी आर्थिक मदत देण्यास टाळाटाळ केली आहे. तसेच प्रशासकीय खेळी करून मदत नाकारल्याचा आरोप भाजपने केला. त्यासाठी स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत आयुक्त पाटील यांचा स्थायी समितीची सभा आठवडाभरासाठी तहकूब करून निषेध करण्यात आला.

















