- १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण होणार नाही…
- परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांना नवीन जिजामाता रुग्णालयात लसीकरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या शनिवारी (दि. ०५) जून रोजी ज्या लाभार्थ्यांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने उद्या दि.०५ जून २०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’ पहिला व दुसरा डोस पालिकेच्या ६३ लसीकरण केंद्रावर १००लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
उद्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी पालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.
उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांकरिता विशेष कोविड-१९ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या वय १८ ते ४४ वर्षे वयोगटातील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांनी आवश्यक वैध पुराव्यानिशी मी जबाबदार ऍपवर ४ जुन २०२१ रोजी दुपारी १२.०० वा. पर्यंत नोंदणी करणेत आलेली आहे, अशा लाभार्थ्यांचे (दि.०५) रोजी पालिकेच्या नविन जिजामाता रूग्णालयात सकाळी १०.०० ते सायं.५.०० या वेळेत ३०० डोसच्या क्षमतेने लसीकरण करणेत येणार आहे. अशा लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर त्यांचे स्वत:चे आधारकार्ड, परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा, व्हिसा मिळणेसाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-20 किंवा DS-160 From या कागदपत्राच्या सत्यप्रतीसह लसीकरण केंद्रावर उपस्थित रहावे.
कागदपत्रांची छाननी करून कागदपत्रांच्या आधारे पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. ज्या लाभार्थ्यांनी मी जबाबदार या ऍप वर नोंदणी केलेली आहे, परंतु आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसल्यामुळे लसीकरणास पात्र झालेले नाहीत, तसेच ज्यांनी मी जबाबदार ऍप वर नोंदणी केलेली नाही त्यांनी दर गुरुवार ते बुधवार पर्यंत मी जबाबदारऍप वर नोंदणी करावी त्यांचे लसीकरण नवीन जिजामाता रुग्णालयात आठवडयामधील दर शनिवारी करण्यात येणार आहे.

















