- आठवडा उलटल्यावर व्यवस्थापकाकडून गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०२१) :- चोरट्यांनी चक्क कॉम्पुटर चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. महापालिकेच्या पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमवरील जम्बो कोविड सेंटर येथे २५ मे रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली.
प्रीती जोसेफ व्हिक्टर (वय ५०, रा. कोंढवा, पुणे) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. ५) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिक्टर या पिंपरीतील नेहरूनगर येथील जम्बो कोव्हीड सेंटरच्या व्यवस्थापक आहेत. अज्ञात चोरट्याने सेंटरमधील ३३ हजार १०१ रुपये किमतीचा सीपीयू, ७ हजार ४५७ रुपयांचा एक मॉनिटर, १ हजार १८६ रुपये किंमतीचा किबोर्ड, असा एकूण ४७ हजार ८४५ रुपये किमतीचा माल चोरून नेला. पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.
















