- लोखंडी चाॅपरने हाता-पायावर वार; ऐवजही लांबवला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जून २०२१) :- निगडी स्पाईन रोड येथून तळवडेकडे जाणाऱ्या रिक्षाने फिर्यादी प्रवास करीत होते. चिकन चौकाच्या पुढे काही अंतरावर रिक्षा आली. रिक्षातील तीन जणांनी फिर्यादी यांना लोखंडी चाॅपर सारख्या हत्याराचा धाक दाखवला. तसेच त्यांच्या हातावर आणि पायावर वार करून जखमी केले.
आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून मोबाईल फोन आणि सॅग असा दोन हजाराचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. ४) घडली. वीरेंद्र अर्जुन सरोज (वय ४३, रा. आल्हाट वस्ती, निघोजे. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षातील तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.